Advertisement

IPL 10 चा विजेता 'महाराष्ट्र', मुंबईची केकेअारवर मात, फायनलमध्ये पुण्याशी भिडणार

वृत्तसंस्था | May 20,2017 12:35 PM IST
बंगळुरू:दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला.मुंबईने बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर दाेन वेळच्या किताब विजेत्या काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला.मुंबई संघाने १४.३ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला.अाता तिसऱ्या किताबासाठी उत्सुक असलेल्या मुंबईला रविवारी फायनलमध्ये पुण्याविरुद्ध झुंजावे लागेल.पराभवामुळे काेलकात्याचे फायनलमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. 
RECOMMENDED FOR YOU