Advertisement

भारताकडे 2600 अण्वस्त्र? NSG देशांकडून मिळालेल्या सूटचा गैरफायदा; पाकिस्तानचा आरोप

दिव्य मराठी वेब टीम | May 20,2017 5:56 AM IST
नवी दिल्ली / इस्लामाबाद- आंतरराष्ट्रीय कोर्टात (ICJ) तोंडघशी पडणाऱ्या पाकिस्तानने भारताकडे कथितरीत्या जवळपास 2600 अण्वस्त्र असल्याचा अजब शोध लावला आहे. एवढेच नव्हे, तर भारत एनएसजी सदस्य राष्ट्रांकडून मिळालेल्या आण्विक वापराच्या सूटचा गैरवापर करत आहे असा आरोप सुद्धा पाकिस्तानने लावला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आयसीजेने स्थगिती दिल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित केली. यात मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी भारतावर विविध प्रकारचे आरोप लावले आहेत. 
RECOMMENDED FOR YOU