Advertisement

25 लाखांच्या दरोड्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्याला अटक, पक्षाने झटकले हात

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20,2017 4:45 PM IST
नवी दिल्ली-25 लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या(AAP)नेत्यासह 6 आरोपींना अटक केली आहे.आरोपी नजीब हा आपच्या यूथ विंगचा नेता असल्याची माहिती मिळाली आहे.नजीब याच्याकडे जाफ्राबादच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.याप्रकरणी आपने मात्र हात झटकले आहे.नजीब याच्याशी पक्षाचा काही एक संबंध नसल्याचे आपचा सूत्रांनी म्हटले आहे.

दुसरीकडे,दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.आप गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.आपमधील गुन्हेगार नेत्यांवर केजरीवाल कारवाई करणार काय?असा सवाल मनोज तिवारी यांनी केला आहे.
RECOMMENDED FOR YOU