Advertisement

एकदा कर्जमाफी द्यावीच लागेल! महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21,2017 2:10 PM IST
जळगाव - शेतकरी अात्महत्यांबाबत राज्य सरकार अंत्यंत गंभीर अाहे. पाच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे, खत, पाण्यासह मजुरांचा माेफत पुरवठा करण्याचा विचार सरकार करीत अाहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शुन्य करून मालाला हमीभाव देण्यात येईल. ज्यामुळे शेतकरी अात्महत्या करणार नाही. सरकारला कर्जमाफी द्यायीची नाही असे नाही. मात्र, एकदा कर्जमाफी द्यावीच लागेल, असे राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अाज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
 ४५ दिवसीय अधिवेशनामुळे सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्यात अालेले पालकमंत्री अजिंठा विश्रामगृहात ते बाेलत हाेते. राज्यातील नापीकीवर जलपूर्नभरण, शेततळी, पाणी साठे उपलब्धतेत वाढ करणे अादी उपाय याेजना, तूर प्राेत्साहन याेजनेमुळे ४० लाख क्विंटल यंदा झाला. दूध, भाज्या, फळे अश्या २२ पिकांना हमी भाव देण्याचा विचार अाहे.  ऊसा प्रमाणे २२ पिंकाना हमी त्यांनी यावेळी सांगितले. 

मनरेगाच्या माध्यमातून शेतीवर मजुर पुरवठा
मध्यप्रदेशात मध्यप्रदेशात मनरेगाच्या माध्यमातून शेतावरील काम करण्यासाठी मजुरांची उपलब्धता करून देण्याचा विचार सरकार करत अाहे. त्यासाठी दाेन अभ्यासगटांना मध्यप्रदेशात अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात अाले अाहे. त्यांचा अहवाल अाल्यानंतर केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार अाहे. तसेही मनरेगातंर्गत प्रस्तावित काम संपत अालेले अाहेत. त्यांनाही काम मिळेल.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
RECOMMENDED FOR YOU