Advertisement

गेल्या वर्षी अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान; राज्‍य सरकार देणार 110 काेटींची मदत

प्रतिनिधी | Jul 12,2018 6:55 AM IST

मुंबर्इ - राज्यात गेल्या वर्षी एप्रिल ते अाॅक्टाेबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अशा  शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 110 काेटी 9 लाख 750 काेटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. 

 
गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी अाणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिके अाणि फळपिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल हाेता. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना अार्थिक मदत मिळावी यासाठी लाेकप्रतिनिधींनी देखील जोरदार मागणी केली हाती. या पार्श्वभूमीवर अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात अाल्या हाेत्या. त्यानंतर यंदाच्या ५ जून राेजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात अाली हाेती. त्यानुसार याचे परिपत्रक १० जुलै राेजी राज्य शासनाने काढले आहे.

 

अशी मिळेल अार्थिक मदत
महसूल विभाग व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के  किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत मिळेल. मदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येर्इल. मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. रक्कमेचे वाटप पूर्ण झाल्यानंतर, रक्कम वाटप करण्यात केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

 
अाधार कार्ड नसेल तरी मिळणार मदत
ही आर्थिक मदत संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येर्इल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल तर तो शेतकरी वंचित राहू नये म्हणून आधार ओळख नोंदणी पावती, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, बँकेचे पासबुक यासारख्या अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्रांच्या आधारे मदतीची रक्कम दिली जाऊ शकेल. 
 
 
 

 

RECOMMENDED FOR YOU