Advertisement

'देशमुख गढी' ढासळली, लातूर महापालिकेत भाजप झीरोवरून हीरो; परभणीत काँग्रेस काठावर

दिव्य मराठी वेब टीम | Apr 22,2017 10:21 AM IST
लातूर/परभणी/चंद्रपूर-संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी काँग्रेसला धूळ चारली.लातुरात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने मनपाच्या चाव्या आपल्या खिशात ठेवल्या.परभणीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला जोरदार धक्का देत काँग्रेसने काठावर पोहोचण्याचा प्रयत्न केला.सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेसला २ सदस्यांच्या कुबड्यांची गरज आहे.
RECOMMENDED FOR YOU