Advertisement

उस्मानाबादनगरीत आज नाट्य संमेलन, उद्घाटनाकडे मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ

प्रतिनिधी | Apr 21,2017 2:05 PM IST
उस्मानाबाद-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबादनगरीत सुरू होत आहे.शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होणार आहे.या संमेलनासाठी राज्यातील नामांकित कलावंतांसह आमदार-खासदारांची उपस्थिती राहणार आहे.मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलन उद्घाटनाला येणार नसल्याची माहिती आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा नाट्यनगरीत रंगली आहे.नाट्यदिंडीने दुपारी 4 वाजता कलावंतांचा हा उत्सव सुरू होत अाहे. 
RECOMMENDED FOR YOU