Advertisement

#Govt_High_High मोहिमेला यश, महामार्ग मद्यालये मुक्तीवरून औरंगाबाद महापौरांची माघार

प्रतिनिधी | Apr 21,2017 8:10 AM IST
औरंगाबाद-शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील मद्यालयांची बंदीतून मुक्तता करण्यासाठी हे राष्ट्रीय महामार्गच मनपाच्या ताब्यात घेऊन त्यांना बंदीतून मुक्ती देण्याच्या हालचाली मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी,प्रशासनाने सुरू केल्या होत्या.गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी तसा प्रस्तावही मांडला जाणार होता.मात्र,या विरोधात दैनिक'दिव्य मराठी'आणिdivyamarathi.comने संयुक्तरित्या चालवलेल्या #Govt_High_Highमोहिमेमुळे समाजातील सर्वच स्तरांतील लोकांनी या विषयाला प्रखर विरोध केल्याने महापौर भगवान घडामोडे आणि पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरातील हायवेंसाठी मंजूर केलेल्या एक हजार कोटी रुपयांवरही अशा प्रस्तावामुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता पाहूनही त्यांना माघार घ्यावी लागली.
RECOMMENDED FOR YOU