Advertisement

PAK: दर्ग्यात दहशतवाद्याने फेकला ग्रेनेड; फुटला नाही तर घेतले स्वत:ला उडवून

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 12:59 PM IST
कराची-पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुफी संत शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत.250 हून अधिक लोक जखमी आहेत.दर्ग्यात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले.हल्ला झाला तेव्हा वेळी शेकडो भाविक दर्ग्यात होते.पोलिसांनी हल्लेखोराची माहिती देणार्‍यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इसिसने या हल्लाची जबाबदारी स्विकारली आहे.या वेळी आणखी एक हल्लेखोर सोबत होता.मात्र,पोलिसांनी त्याला तत्काळ गोळ्या घातल्या.या दर्ग्यापासून रुग्णालय 50 किमी दूर असल्याने मदत पोहचण्यास विलंब झाला.त्यामुळे मृतांची संख्या वाढली.गेल्या सात दिवसांत पाकिस्तानात झालेला हा पाचवा मोठा स्फोट आहे.दर्ग्यातील महिलांसाठी राखीव असलेल्या भागामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow