Advertisement

मुंबई- व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण; देशातील मोठी दूरसंचार कंपनी होणार

दिव्य मराठी नेटवर्क | Mar 21,2017 12:15 PM IST
मुंबई - देशातील क्रमांक दोन व तीनच्या दूरसंचार कंपन्या व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांनी विलीनीकरणाची घोषणा केली. विलीनीकरणानंतर ग्राहक संख्या व महसूल या दोन्ही दृष्टीने ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी होईल. विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर आता रिझर्व्ह बँक, सेबी आणि अन्य मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. व्होडाफोन इंडिया ब्रिटिश फर्म व्होडाफोनची भारतीय शाखा आहे. आयडिया सेल्युलर बिर्ला समूहाची लिस्टेड कंपनी आहे. 
 
नव्या कंपनीच्या संचालक मंडळात १२ सदस्य असतील. व्होडाफोन आणि व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण; देशातील मोठी दूरसंचार कंपनी होणार बिर्ला समूहाकडे प्रत्येकी तीन सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार असेल. कुमारमंगलम बिर्ला याचे चेअरमन असतील. बिर्ला यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्होडाफोनचे सीईओ व्हिटोरियो कोलाओ म्हणाले, मुख्य वित्त अधिकाऱ्याची नियुक्ती त्यांची कंपनी करेल. सीईओ व सीओओंची नियुक्ती दोन्ही कंपन्या मिळून करतील. व्होडाफोन ग्रुपचा (यूके) सरकारसोबत १४,२०० कोटी रुपयांचा करविषयक वाद सुरू आहे. या वादाचा करारावर परिणाम होणार नाही.  

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow