Advertisement

17 वी संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास उद्यापासून सुरूवात

दिव्य मराठी वेब टिम | Apr 17,2017 3:45 PM IST
व्हेंटिलेटर,कासव,दशक्रियासह 11 चित्रपटांची मेजवानी
मुंबई : संस्कृती कलादर्पण गौरव रजनीच्या दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचा उदघाटन समारंभ १८ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ११ मराठी चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून उदघाटनाच्या दिवशी दुपारी २ वाजता दशक्रिया चित्रपटाने यामहोत्सवाची सुरुवात होणार आहे. 
 
 या चित्रपट महोत्सवासाठी घुमा, कासव, नातीखेल, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरणकुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या अंतिम ११ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ज्यात गुरु,पोस्टर गर्ल आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरणकुलकर्णी हे तीन चित्रपट काही तांत्रिक कारणास्तवदाखविले जाणार नाहीत. हे सारे चित्रपट रसिकांना ५० रूपये या माफक दरात पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकारमंडळींसोबत खेळ पाहण्याची सुवर्णसंधीप्रेक्षकांना मिळत असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.
 
४७ चित्रपटांपैकी अंतिम ११ चित्रपट निवडले असून प्रथम कलाकृतीला रोख दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे व अध्याक्षा अर्चना नेवरेकर यांनी सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
RECOMMENDED FOR YOU