Advertisement

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरली 'क्वीन', थुकरटवाडीत अशी केली धमाल

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 1:04 PM IST
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचं आकर्षण बॉलिवूडवाल्यांमध्ये वाढतच आहे. आजवर बॉलिवूडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे ते नाव म्हणजे बॉलिवूडची ‘क्वीन’ अशी ओळख असलेली  अभिनेत्री कंगना रनोट. आपल्या आगामी 'रंगुन' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. येत्या सोमवारी 20 फेब्रुवारीला रात्री 9.30 वा. हा भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow