Loading...

बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा इसापूर येथील धरणात बुडून मृत्यू

पोळ्यानिमित्त बैलाला धुण्यासाठी धरणात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.

Divya Marathi Sep 10, 2018, 12:36 IST

अकोला- पोळ्यानिमित्त बैलाला धुण्यासाठी धरणात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाने युवकाचा मृतदेह बाहेर काढला. 


गौरव संतोष ऐकणार (वय १६, रा. चिंचखेड ता. बार्शीटाकळी) असे युवकाचे नाव आहे. गौरव रविवारी पोळ्यानिमित्त बैलांना चारल्यानंतर कारंजा ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत इसापूर धरणात बैल धुण्यासाठी उरतला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बैलाला खोल पाण्यात घेऊन गेला. त्यात तो बुडाला. घटनेची माहिती पिंजरचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध, बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळेंना माहिती दिली. त्यानंतर पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह विकी साटोटे, उमेश बील्लेवार, सतीश मुंडाले, ऋतीक सदाफळे, गोविंदा ढोके, अजय सुरडकर, मंगेश अंधारे, अक्षय चांभारे घटनास्थळी पोहोचले. दुपारी गौरवचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले. या वेळी बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे उपस्थित होते. 


Loading...

Recommended


Loading...