Loading...

एवढ्या महिन्यांतच आपल्या पार्टनरला बोर होतात महिला, हे आहे कारण

आज सर्व क्षेत्रात मुली मुलांपेक्षा पुढे असतात. मात्र प्रेम करण्यात मुलं मुलींपेक्षा पुढे आहेत.

Divya Marathi Sep 12, 2018, 00:00 IST

नवी दिल्ली: आज सर्व क्षेत्रात मुली मुलांपेक्षा पुढे असतात. मात्र प्रेम करण्यात मुलं मुलींपेक्षा पुढे आहेत. मुलांना प्रेम करण्यास थोडा उशीर लागतो, परंतू एकदा त्यांनी प्रेम केले तर ते आयुष्यभर विसरु शकत नाही. परंतू मुलींसोबत असे घडत नाही. आपले जीवन यशस्वीरित्या जगण्यासाठी प्रत्येकाला पार्टनरची गरज असते. एका रिसर्चमध्ये उघड झाले आहे की, महिला या आपल्या पार्टनरसोबत संबध ठेवून वर्षभराच्या आतच बोर होऊन जातात. एका मीडिया रिपोर्टनुसार, एका संशोधनात याचा खुलासा झाला आहे. हे संशोधन कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटी, सैन फ्रान्सिस्कोच्या वैज्ञानिकांनी केले. साउथेम्प्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनीही हा शोध लावला आहे. त्यांनी जवळपास 11,508 लोकांवर सर्वे केला. त्यानुसार संबंधांविषयी महिलांमधील उत्साह लवकर संपतो. परंतू पुरुषांमध्ये असे अजिबात होत नाही.

 

या संशोधनासाठी 6,669 महिला आणि 4,839 पुरुषांना निवडण्यात आले. हे सर्वच आपल्या पार्टनरससोबत गेल्या एक वर्षांपासून सक्रिय रुपात संबंध ठेवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना आपल्या मुलांमुळेही सेक्स लाइफमध्ये रस राहत नाही. महिलांना विचारण्यात आले की, या 3 महिन्यात संबंध बनवण्यासाठी किती महिलांना उत्साह आला हे विचारण्यात आले. तेव्हा आढळले की, फक्त 50 टक्के महिलांना उत्साह आला. संशोधकांनुसार जास्तीत जास्त महिला या आपल्या सेक्स लाइफमुळे आनंदी नाहीत. त्यांना आपल्या पार्टनरपासून अंतर ठेवून राहायला आवडते. 

 


Loading...

Recommended


Loading...