Loading...

पतीने फेसबुकवर बदनामी केल्याने पत्नीची अात्महत्या, नाशकातील घटना

चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ करत बनावट फेसबुक अकाउंट बनवून पतीने त्यावरून बदनामी केल्याने पत्नीने गळफास घेत

Divya Marathi Sep 04, 2018, 07:40 IST

नाशिक- चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ करत बनावट फेसबुक अकाउंट बनवून पतीने त्यावरून बदनामी केल्याने पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीनुसार पाेलिसांनी संशयित पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली अाहे. 


मनीषा कवडे असे मृताचे नाव आहे. तिला येत असलेले फोन आणि मेसेजवरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत पती प्रशांत आणि सासू भारती यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये काढून घेतले. रो-हाऊस घेण्यासाठी १० लाखांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता पतीने तिचे बोगस फेसबुक खाते उघडत अनोळखी पुरुषांशी चॅटिंग केली. या जाचाला कंटाळून तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार भावाने पोलिसांत दिली. तक्रारीची दखल घेत इंदिरानगर पोलिसांनी चौकशीअंती संशयित पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...