Loading...

पत्नीने केली पतीची हत्या; ओढणीच्या साहाय्याने आवळला गळा, हे होते कारण

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाठी येथील एका कुटुंबात व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या

Divya Marathi Sep 08, 2018, 12:32 IST

वणी- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाठी येथील एका कुटुंबात व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केली. ही घटना दि. ७ सप्टेंबरला पहाटेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक करत खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 


लाठी येथे मोतीराम धोबे वय ४८ वर्ष तसेच त्यांची पत्नी माया वय ३७ वर्ष हे मोलमजुरी करून राहत आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. परंतु मोतीरामला दारूचे व्यसन जडल्याने या कुटुंबात किरकोळ वाद नित्याचेच झाले होते. मोतीरामच्या मनात संशयाचे भूत शिरले. यातून तो नेहमीच पत्नी माया हिला मारहाण करत असल्याने पत्नी कंटाळली होती. तीने मुलगी चंद्रपूर येथे गेली होती. तर मुलगा झोपेत होता. यासंधीचा फायदा घेत शुक्रवारी पहाटे ओढणीच्या साहाय्याने मायाने मोतीरामचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. 


Loading...

Recommended


Loading...