Loading...

KBC रेयर एपिसोड : जेव्हा सर्व 10 स्पर्धकांनी दिले होते फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या सोप्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर

कधीकधी या शोमध्ये असेही स्पर्धक येतात, जे अतिशय सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत.

Divya Marathi Sep 05, 2018, 19:16 IST

बॉलिवूड डेस्कः 'कौन बनेगा करोपती'चे दहावे पर्व सोमवारपासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. या शोच्या मंचावर अनेक लोक लाखो-कोटी रुपये जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून सहभागी होत असतात. पण कधीकधी या शोमध्ये असेही स्पर्धक येतात, जे अतिशय सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. असाच रंजक किस्सा या शोच्या आठव्या पर्वात घडला होता, या पर्वात फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये 10 पैकी 10 स्पर्धक फेल झाले होते. 

 

हा होता पूर्ण किस्सा... 
ही गोष्ट 'KBC 8' च्या 45व्या एपिसोडची आहे. नेहमीप्रमाणे बिग बींनी सर्व 10 स्पर्धकांची ओळख करुन दिली आणि फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा त्यांना प्रश्न विचारला.  प्रश्न होता - "हिन्दी फिल्म् के टाइटल्स को उनके घटते क्रम में लगाएं" वेळ निघून गेल्यानंतर बिग बींनी योग्य क्रम सांगतला. जो याप्रकारे होता.

 

A.बीस साल बाद 
C.100 डेज 
D.वो सात दिन
B. 36 घंटे

 

अंकांना बघितले प्रश्न समजलाच नाही : बिग बींनी योग्य उत्तर दिल्यानंतर स्पर्धकांची यादी बघितली तेव्हा त्यामध्ये योग्य उत्तर देणा-या एकाचेही नाव सामिल नव्हते. हे बघून स्वतः बिग बीसुद्धा हैराण झाले.  जेव्हा त्यांनी सर्व स्पर्धकांना प्रश्नाचे उत्तर देताना नेमकी कुठे अडचण आली, असे विचारले असता सगळ्यांनी ऑप्शन्समध्ये दिलेल्या अंकांवर लक्ष दिले. पण हे अंक टाइम पीरिएड दर्शवत असल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.

 

बिग बींनी विचारलेला दुसरा प्रश्न : यानंतर बिग बींनी 10 स्पर्धकांसमोर फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा दुसरा प्रश्न ठेवला, त्याचे उत्तर फक्त तीनजण देऊ शकले. प्रश्न होता, "सल्तनत काल के इन ऐतिहासिक शासकों को उनके शासनकाल के वर्ष के अनुसार, पहले से बाद के क्रम में सजाएं"

 

A.फिरोजशाह तुगलक 
B.अलाउद्दीन खिलजी 
C.इब्राहिम लोधी 
D.कुतुबुद्दीन ऐबक

 

आणि याचे योग्य उत्तर होते...
 
D.कुतुबुद्दीन ऐबक (1206)
B.अलाउद्दीन खिलजी (1296)
A.फिरोजशाह तुगलक (1351)
C.इब्राहिम लोधी (1517


Loading...

Recommended


Loading...