Loading...

​विराट काेहली अव्वल स्थानावर कायम; शमी टाॅप-२० मध्ये दाखल

टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने साेमवारी अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीतील अापले नंबर वनचे सिंहासन कायम ठेवले.

Divya Marathi Sep 04, 2018, 08:38 IST
दुबई- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने साेमवारी अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीतील अापले नंबर वनचे सिंहासन कायम ठेवले. ताे फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर अाहे. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने करिअरमधील १९ वे कसाेटी अर्धशतक साजरे केले. त्याचे यादरम्यान ५८ धावांचे याेगदान राहिले. याचा त्याला क्रमवारीत माेठा फायदा झाला. यातूनच त्याने अापले अव्वल स्थान राखून ठेवले अाहे. तसेच त्याने या कसाेटीच्या पहिल्या डावात ४६ धावांची खेळी केली हाेती. याच कसाेटीतील शतकाचा चेतेश्वर पुजारालाही माेठा फायदा झाला. त्याने सहाव्या स्थानावर धडक मारली. त्याने करिअरमध्ये सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले. त्याने १३२ धावांची शानदार खेळी केली. चार बळी घेणाऱ्या शमीने गाेलंदाजांच्या टाॅप-२० मध्ये स्थान मिळवले. ताे अाता १९ व्या स्थानावर अाला अाहे. 


Loading...

Recommended


Loading...