Loading...

Video:साथीदार मरताना पाहून खिडकीतून विनवण्या करत होते दोघे गुंड, लोकांनी केली निर्घृण हत्या

तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर इतर दोघांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Divya Marathi Sep 09, 2018, 00:03 IST

बेगूसराय - येथील एका सरकारी शाळेतील 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीचे अपहरण करण्यासाठी आलेल्या तीन गुंडांची निर्घृण हत्या जमावाने केली होती. या घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. पोलिसांनी दोन गुंडांना गर्दीच्या ताब्यातून वाचवून एका खोलीत बंद केले होते. आपला साथीदार मरत असल्याचे पाहून ते दोघे विनवण्या करत होते. पण लोकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट कुलूप तोडून त्यांना बाहेर काढले आणि निर्घृणपणे मारहाण करत त्यांची हत्या केली. या तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर इतर दोघांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

पुढे पाहा, व्हिडिओ आणि इतर काही PHOTOS


Loading...

Recommended


Loading...