Loading...

मुलाला 'आया'कडे सोडून जायचे कपल, काही महिन्यांनी एक व्हिडिओ पाहून समोर आले सत्य

एक दिवस एका मुलीने या मुलाच्या वडिलांशी संपर्क केला आणि त्यांना एक व्हिडिओ पाठवला. आया टॉर्चर करत असल्याचे दिसत होेते.

Divya Marathi Sep 08, 2018, 11:44 IST

एजटेक - अमेरिकेत एक कुटुंब त्यांच्या 9 वर्षांच्या मुलाबरोबर झालेल्या टॉर्चरमुळे दहशतीत आहेत. हे कपल त्यांच्या डाऊन सिंड्रोम (मेडिकल कंडिशन) ग्रस्त मुलाला आयाकडे सोडून ऑफिसला जात होते. पण एक दिवस एका मुलीने या मुलाच्या वडिलांशी संपर्क केला आणि त्यांना एक व्हिडिओ पाठवला. त्यात आया त्या मुलाला टॉर्चर करत असल्याचे दिसत होते. तो व्हिडिओ पाहताच कपलला धक्का बसला. व्हिडिओमध्ये आया मुलाला बळजबरी सिगारेट पाजताना मारताना दिसत होते. कपलने लगेचच पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर या आयाला अटक करण्यात आली. मुलाच्या वडिलांनी व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करून सत्य जगासमोर आणले आहे. 


असे समोर आले सत्य 
- न्यू मेक्सिकोच्या एजटेकमधील अमांडा आणि जोश ग्रीनहॉस आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा ब्रिकॅन या कुटुंबाबरोबर ही घटना घडली. कुटुंबाने मुलाची देखभाल करण्यासाठी दोन आया ठेवल्या होत्या. 
- सर्वकाही सुरळीत होते, पण एक दिवस एका अनोळखी मुलीने कपलशी संपर्क केला. त्यांनी या मुलीने त्यांच्या मुलाच्या टॉर्चरला व्हिडिओ पठवला. 
- व्हिडिओत एक आया मुलाला बळजबरी सिगारेट पाजताना तर दुसरी त्याला पाण्याची बाटली फेकून मारताना दिसत होती. मुलाला बोलता येत नव्हते त्यामुळे त्याच्याबरोबर काय घडते कुणालाही कळत नव्हते. 
- नंतर त्यांना मुलाला टॉर्चर केल्याचे आणखी तीन व्हिडिओ मिळाले. एकाच तर आयाने मुलाच्या तोंडावर दार मारल्याचेही समोर आले. तर एका व्हिडिओत मुलाच्या तोंडात आइस्क्रीम स्टीक कोंबत असल्याने त्याचा श्वास गुदमरल्याचे दिसत होते. 
 


Loading...

Recommended


Loading...