Loading...

'सर्जिकल'वेळी जवानांकडून बिबट्याच्या विष्ठा, मूत्राचा वापर; लेफ्टनंट निंभाेरकरांनी उलगडला अनुभव

भारतीय लष्कराने पाकिस्तान हद्दीत शिरून गोपनीयरीत्या सर्जिकल स्ट्राइक केला ही बाब महत्त्वपूर्ण असून त्यामुळे पाकिस्तानला

Divya Marathi Sep 12, 2018, 09:00 IST

पुणे - भारतीय लष्कराने पाकिस्तान हद्दीत शिरून गोपनीयरीत्या सर्जिकल स्ट्राइक केला ही बाब महत्त्वपूर्ण असून त्यामुळे पाकिस्तानला भारतीय लष्कराची ताकद समजली. शत्रूच्या गोटात शिरताना पाकिस्तानी चौकी, जमिनीत पुरलेले भूसुरुंग,जंगलात आणि गावात असणारी कुत्री ही आव्हाने सैनिकांसमोर होती. कुत्र्याच्या आवाजाने कारवाईची चाहूल समोरील व्यक्तींना लागू शकली असती. त्यामुळे विशेष खबरदारी बाळगण्यात आली. कुत्री ही बिबट्याच्या वासाने गारठून जातात आणि भुंकत नाहीत. याबाबत खात्रीपूर्वक माहिती अभ्यासण्यात आली होती. त्यानुसार सर्जिकल स्ट्राइकवेळी माझ्या तीन तुकड्यांतील जवानांनी बिबट्याची विष्ठा आणि मूत्र वापरले होते. त्यामुळे वेळेत विनाअडथळा लक्ष्यापर्यंत पोहोचू शकल्याची माहिती सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांनी मंगळवारी दिली. या वेळी संपूर्ण सर्जिकलचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.  


थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आयोजित “थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार २०१८’ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान करण्यात आला. पेशवे यांचे वंशज उदय पेशवे व्यासपीठावर उपस्थित होते.  निंभोरकर म्हणाले, पाकिस्तानमधून आलेल्या दहा अतिरेक्यांनी उरी येथे हल्ला करून १७ सप्टेंबर २०१६ रोजी जीवितहानी केली. त्याचा बदला घेण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करातील प्रमुखांची बैठक घेऊन कशा प्रकारे कारवाई करू शकतो, याची माहिती घेतली.  त्यानंतर पंतप्रधानांसह निवडक १०० लोकांना अशा प्रकारे कारवाईची माहिती होती. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ३७ ठिकाणांपैकी ७ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी तीन लक्ष्यांचे नेतृत्व माझ्याकडे होते,असेही ते म्हणाले. 


Loading...

Recommended


Loading...