Loading...

हॉट अंदाज सोडून देसी अवतारात दिसली अभिनेत्री, अनुष्काला कॉपी केल्यामुळे झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल उर्वशी रौतेलाने आपला बोल्ट हॉट अंदाज मागे सारत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Divya Marathi Sep 07, 2018, 00:00 IST

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल उर्वशी रौतेलाने आपला बोल्ट हॉट अंदाज मागे सारत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी साडीमध्ये दिसतेय. तिने एकदम गावातील महिलांसारखा देसी मेकअप केला आहे. उर्वशीने या परफेक्ट लूकसाठी त्वचेवर खुप मेकअपर केला. तिने हा लूक मिळवण्यासाठी तिच्या त्वचेवर 10 शेड्स डार्कर मेकअप केला आहे. तिने या फोटोला "इन्सान ख्वाहिशों से बंधा, एक जिद्दी परिंदा है जो उम्मीदों से ही घायल है और उम्मीदों से ही जिंदा है" असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडिया यूजर्सने तिचे या लूकचे कनेक्शन 'सुई धागा' चित्रपटातील अनुष्काच्या लूकशी जुळवले आहे. 


55 लाखांची साडी घालून आली होती चर्चेत 
- उर्वशी रौतेलाने देहरादूनमध्ये आपल्या कजिनच्या लग्नात गोल्डन हेवी साडी आणि ज्वेलरी घातली होती. 
- उर्वशीची साडी 55 लाखांची होती. यावर तिने हेव ज्वेलरी घातली होती. ज्वेलरीची किंमत जवळपास 28 लाख होती. तिने एकुण 1 कोटींची साडी आणि ज्वेलरी घातलेली होती. तेव्हा ती चर्चेत आली होती. 

 

उर्वशीने या चित्रपटांमध्ये केले आहे काम 
- उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये 'सिंह साहब द ग्रेट' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यासोबतच ती 'भाग जॉनी' (2015), 'सनम रे' (2016), 'ग्रेट ग्रैंड मस्ती' (2016), 'काबिल' (2017) चित्रपटांमध्ये दिसली होती. परंतू उर्वशी अजूनही कोणताही हिट चित्रपट देण्यात यशस्वी झालेली नाही. 

 


Loading...

Recommended


Loading...