Loading...

वाढत्या एनपीएसाठी यूपीए, एनडीए जबाबदार; राजन यांनी संसदीय समितीला पाठवले उत्तर

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठवलेल्या उत्तरात बँकांतील वाढत्या अनुत्पादक मालमत्तेसाठ

Divya Marathi Sep 11, 2018, 05:48 IST

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठवलेल्या उत्तरात बँकांतील वाढत्या अनुत्पादक मालमत्तेसाठी (एनपीए) अति आशावादी बँकर्स व सरकारच्या निर्णय प्रक्रियेतील सुस्तीला जबाबदार ठरवले. 


राजन यांनी म्हटले की, यूपीए व नंतरच्या एनडीए सरकारच्या काळातही गर्व्हनन्सच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात कोळसा खाणींचे संशयास्पद पद्धतीने वितरण व तपासाच्या भीतीने सरकारने निर्णयाची गती मंदावत गेली. त्यामुळे अपूर्ण योजनांचा खर्च वाढत गेला. दुसरीकडे कंपन्यांनी घेतलेले कर्ज फेडण्यात असमर्थतता दर्शवली. देशात विजेची कमतरता असताना बंद पडलेले वीज संयंत्र पाहता सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आवश्यक ती गती आली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.


Loading...

Recommended


Loading...