Loading...

देशातील पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर, 23 ऑगस्टला होणार लाँच, 1 लीटर पेट्रोलमध्ये 70KM चा मायलेज

या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलबरोबरच बॅटरीवरही चालेल. अशा प्रकारचे फिचर असणारी ही पहिली स्कूटर आहे.

Divya Marathi Aug 14, 2018, 00:00 IST

अॅटो डेस्क - देशातील पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर TVS iQube 23 ऑगस्टला लाँच होत आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीने ही स्कूटर लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. 2010 च्या अॅटो एक्स्पोमध्ये ही स्कूरटर सादर करण्यात आली होती. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलबरोबरच बॅटरीवरही चालेल. अशा प्रकारचे फिचर असणारी ही पहिली स्कूटर आहे. पण अद्याप या स्कूटरबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. 


पेट्रोल संपण्याचे टेन्शनच नाही 
यात 110cc चे सिंगल सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. त्याचबरोबर यात इलेक्ट्रीक मोटरही आहे. ती 150Wh आणि 500Wh च्या बॅटरीसह येते. इलेक्ट्रीक मोटर स्कूटरमध्ये इकॉनॉमी आणि पॉवर रायडिंग मोड्समध्ये कंट्रोल करते. म्हणजे ही स्कूटर ताशी 20KM च्या वेगाने धावेल तेव्हा तिला इलेक्ट्रीक मोटरकडून पॉवर मिळेल. तर त्याच्यापुढे वेग जाताच त्याला पेट्रोल इंजिनकडून पॉवर मिळायला सुरुवात होईल. पेट्रोलवर ती 70kmpl चे मायलेज देईल. 


कंपनीची सर्वात स्टायलीश स्कूटर 
ही स्कूटर 8 वर्षांपूर्वी शोकेस करण्यात आली होती. त्यामुळे तिचे डिझाइन तसेच असेल का याबाबत सांगता येत नाही. कंपनीने तेव्हा कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. पण ही TVS ची सर्वात स्टायलीश लूकची स्कूटर असणार हे नक्की तरुणाईला समोर ठेवून ही स्कूटर डिझाइन करण्यात आली आहे. ही इको फ्रेंडली स्कूटर आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...