Loading...

'इश्कबाज'च्या अभिनेत्रीने बिझनेसमनसोबत केला साखरपुडा, यूजर्स म्हणाले - कोण आहे हा अंकल

'इश्कबाज' या टीव्ही मालिकेतील रागिनी मल्होत्रा म्हणजेच आदिती गुप्ता(30)ने साखरपुडा केला आहे.

Divya Marathi Sep 04, 2018, 00:00 IST

मुंबई : 'इश्कबाज' या टीव्ही मालिकेतील रागिनी मल्होत्रा म्हणजेच आदिती गुप्ता(30)ने साखरपुडा केला आहे. आदितीने प्रायव्हेट सेरेमनीमध्ये कबीर चोप्रासोबत साखरपुडा केला आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याची माहिती दिली. कबीर हा बिझनेसमन आहे. आदितीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर साखरपुड्याचे फोटोज शेअर केले. यावर तिने लिहिले की,  "मैंने ना कह दिया… मजाक कर रही हूं… वह मेरे हैं।" अदिती तिच्या पर्सनल लाइफमध्ये खुप आनंदी आहे, परंतू तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा निर्णय आवडलेला नाही. आदितीचा होणा-या नव-याचा वयस्कर लूक पाहून तिचे चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. एकाने विचारले की, 'हे अंकल कोण आहेत?' 'हा राखीचा फोटो आहे?' एक कमेंट आहे की, - 'व्हेरी बॅड चॉइस'  परंतू आदितीला 'ये है मोहब्बते'चा अॅक्टर करण पटेली आणि एकता कपूरसोबतच सर्वच टीव्ही सेलेब्सने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पहिले एकता कपूरच्या फ्रेंडला केले आहे डेट 
- आदितीचे अफेअर यापुर्वी एकता कपूरचा फ्रेंड रिजवान बाचवसोबत होते. रिजवान एक प्रोफेशनल मॉडल आणि इनवेस्टमेंट बँकर आहे. 
- आदिती आणि रिजवान एकमेकांना 5 वर्षांपासून ओळख होते. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. 
- सुरुवातीला हे दोघं मित्र होते. परंतू नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्ष यांचे अफेअर सुरु होते. 
- रिपोर्ट्सनुसार दोघंही लग्नाचा प्लान करत होते. परंतू 2017 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. रिजवाननंतर आदितीचे नाव लक्ष्य लालवानी आणि हर्षद चोप्रासोबतही जोडले गेले होते. 

 

या शोजमध्ये आदितीने केले आहे काम 
- आदिती ही 'किस देश में हे मेरा दिल' मधून प्रसिध्द झाली होती. या मालिकेत तिने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. 
- यासोबतच तिने  'जरा नचके दिखा', 'संजोग से बनी संगिनी', 'पुनर्विवाह', 'हिटलर दीदी', 'बदलते रिश्तों की दास्तां', 'ये है आशिकी', 'कबूल है', 'काला टीका', 'परदेस में है मेरा दिल', 'इश्कबाज' आणि 'बॉक्स क्रिकेट लीग' मध्ये काम केले आहे. 
- अभिनेत्री बनण्यापुर्वी आदिती एक प्रोफेशनल फॅशन डिझाइनर राहिली आहे. 


Loading...

Recommended


Loading...