Loading...

चाळीतून आलेल्या मुलीला लोक करत राहिले रिजेक्ट, 500 पेक्षा जास्त ऑडिशन दिल्यावर मिळाले काम

‘सपने सुहाने लडकपन के...’फेम महिमा मकवानाने कमी वेळेतच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवली आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 15:26 IST

मुंबई: ‘सपने सुहाने लडकपन के...’फेम महिमा मकवानाने कमी वेळेतच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या महिमाने टीव्हीवर  'दिल की बातें दिल ही जाने', 'अधूरी कहानी हमारी', 'कोड रेड', 'प्यार तूने क्या किया', 'रिश्तों का चक्रव्यू' सारख्या शोजमध्ये काम केले आहे. खुप कमी लोकांना माहिती असेल की, चार महिन्यांची असतानाच महिमाच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर तिने कुटूंबासोबत दहिसरमधील एका चाळीत 15 वर्षे स्ट्रगल केला. टीव्ही इंडस्ट्रीत एंट्री घेतल्याच्या दोन वर्षांनंतर 2015 मध्ये तिने मुंबईमध्ये मीरा रोड परिसरात एक नवीन घर खरेदी केले आणि आपल्या आईला गिफ्ट केले. आज महिमाकडे स्वतःची 8 लाखांची स्कोडा कारही आहे. 


500 पेक्षा जास्त ऑडिशनमध्ये झाली होती रिजेक्ट 
- 1999 मध्ये किडनी इन्फेक्शनमुळे महिमाच्या वडिलांचे निधन झाले. ते कंस्ट्रक्शन फील्डमध्ये होते. 
- वडिलांच्या निधनानंतर महिमाचा सांभाळ तिच्या आईने आणि भावाने केला. महिमाची आई पहिले सोशल वर्कर होती आता त्या मुलीचे काम पाहतात. महिमाचा मोठा भाऊ अकाउंटेट आहे. 
- आमच्या वेबसाइटशी बोलताना महिमाने सांगितले होते की, "मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. परंतू फिल्डमध्ये ओळख बनवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मला आजही आठवते मी 500 पेक्षा जास्त ऑडिशन्स दिले होते. मला रिजेक्ट केले जात होते. अनेक वेळा फेल झाल्यानंतर मी सर्व सोडून देण्याचा विचार केला. परंतू माझी आई मला मोटिवेट करत राहिली."
- "आज मी जे काही आहे, ते आईच्या विश्वास आणि डेडिकेशनमुळे आहे. मला 'सपने सुहाने लडकपन के'मध्ये प्रमुख भूमिका मिळाली म्हणून मी आभारी आहे. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. मी स्वतःवर प्राउड फील करते. कोणत्याही गॉडफादर शिवाय मी या इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली आहे."


चाळीत राहण्यास काहीच अडचण नाही 
- महिमा सांगते की, "मला चाळीत राहण्यास काहीच अडचण नाही, कारण माझा जन्म तिथेच झाला आणि मी तिथेच राहिले. ती म्हणाली की, मला संधी मिळाली तर मी आयुष्यभर चाळीत राहणे पसंत करेल." 
- ती म्हणते की, "तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतू लोक मला म्हणायचे की, घर खरेदी करुन घेतलं पाहिले, भाड्याची का असेना एक कार पाहिजे."
- "ते म्हणायचे की, चाळीतून येणे एका अॅक्टर पर्सनॅलिटीला शोभत नाही. परंतू मी त्यांचे ऐकले नाही. माझ्या जवळ स्वतःचे एक घर होते. चाळीत राहत होते म्हणून काय झाले? मला माझ्या पैशांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न होते. आपले बॅग्राउंड काय ते महत्त्वाचे नसते. अखेर आपले हार्ड वर्क आणि डेडिकेशनचीच चर्चा होते."

 

तेलुगु चित्रपटांमध्ये डेब्यू करतेय महिमा 
- झीटीव्हीच्या  'सपने सुहाने लड़कपन के' मध्ये रचना गर्गची भूमिका केल्यानंतर महिमाला सोनी टीव्हीच्या 'दिल की बाते दिल ही जाने' आणि झीटीव्हीच्या 'अधूरी कहानी हमारी'मध्ये भूमिका मिळाली.
- ती तेलुगु फिल्म  'वेंकटापुरम' मधून ती साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतेय. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होऊ शकतो.
 

 


Loading...

Recommended


Loading...