Loading...

​जम्मू-काश्मिरातील कुपवाडा जिल्ह्यात चकमक; 'ताेयबा'च्या दाेन अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मिरातील सीमावर्ती कुपवाडा जिल्ह्यात मंगळवारी लष्करी जवानांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-ताेयबाचे दाेन अतिरेकी ठार

Divya Marathi Sep 12, 2018, 07:12 IST
श्रीनगर- जम्मू-काश्मिरातील सीमावर्ती कुपवाडा जिल्ह्यात मंगळवारी लष्करी जवानांशी झालेल्या चकमकीत लष्कर- ए- ताेयबाचे दाेन अतिरेकी ठार झाले. हंदवाडा भागातील गुलुरा गावाजवळ ही चकमक झाली. फुरकान राशिद लाेन ऊर्फ अादिल अाणि लियाकत अहमद लाेन अशी मृत अतिरेक्यांची नावे असल्याचे लष्कराकडून सांगण्यात अाले. दरम्यान, बहिणीचा निकाह सुरू असतानाच लियाकतच्या मृत्यूची बातमी अाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. ताे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणातही वाँटेड हाेता. लियाकतने शनिवारी एकाची हत्याही केली हाेती. 


Loading...

Recommended


Loading...