Loading...

Sweden च्या शाही म्युझियमवर दरोडा, 17 व्या शतकातील मुकूट घेऊन स्पीड बोटने पळाले चोरटे

स्वीडनच्या शाही घराण्याचे 17 व्या शतकातील 2 राजमुकूट चोरीला गेले आहेत.

Divya Marathi Aug 02, 2018, 17:54 IST

स्टॉकहोम - स्वीडनच्या शाही घराण्याचे 17 व्या शतकातील 2 राजमुकूट चोरीला गेले आहेत. दोन चोरट्यांनी हे कृत्य करून घटनास्थळावरून चक्क स्पीडबोटने पळ काढला. शाही घराण्याचे मुकूट आणि इतर मोल्यवान ज्वेलरी म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. प्रदर्शनात गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी सिक्युरिटी अलार्म बंद केले होते. तसेच सिक्युरिटी ग्लास तोडून मुकूट तसेच ज्वेलरी घेऊन पळ काढला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, ते इतक्या वेगाने निघून गेले की काही सेकंद नेमके काय घडले हे कळालेच नाही. 


इंटरपोलची मदत...
>> ही घटना स्टॉकहोमपासून 60 किमी दूर एका छोट्या शहरात मंगळवारी घडली आहे. चोरांनी जे मुकूट चोरले ते राजा कार्ल IX आणि रानी क्रिस्टियाना यांचे मुकूट होते. दोन्ही मुकूट सोन्याचे होते. त्यामध्ये अतिशय दुर्मिळ आणि मोल्यवान रत्न होते. परंतु, या दोन्ही मुकूटांची किंमत नेमकी किती होती हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. 
>> स्टॉकहोम पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, चोरी गेलेल्या साहित्यांना पैश्यांपेक्षा ऐतिहासिक महत्व आहे. ही स्वीडनची राष्ट्रीय संपत्ती आहे. चोरांना ते देशात विकणे अशक्य आहे. त्यामुळे ते स्वीडनच्या बाहेर जाऊन परदेशात त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करतील. अशात स्वीडन पोलिस इंटरपोलच्या मदतीने त्या चोरांचा शोध घेत आहे. 


Loading...

Recommended


Loading...