Loading...

मुंब्र्यातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमनच्या दोन बंबांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

मुंब्र्यातील शीळ फाटा भागात असलेल्या खान कंपाउंडमध्ये एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 10:20 IST

ठाणे  - मुंब्र्यातील शीळ फाटा भागात असलेल्या खान कंपाउंडमध्ये एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी आगीचे मोठमोठे लोट उठत असून अग्निशमन दलाच्या दोन बंबांकडून तसेच पाण्याच्या दोन टँकरकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Thane: Fire breaks out in a godown at Khan compound in Mumbra's Shil Phata. Two fire tenders present at the spot. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/CTSJPsdEaa

— ANI (@ANI) September 12, 2018

 

प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, गोदाम बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. गोदाम सुरू असते तर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असती, अशी चर्चा सुरू आहे. अधिक तपासअंती आगीच्या कारणांचा शोध लागू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अग्निकांडाचे आणखी Photos...

 


Loading...

Recommended


Loading...