Loading...

तेलंगण : बस दरीत कोसळून ५२ जण ठार; मृतांमध्ये २० महिला, सहा बालकांचा समावेश

तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात कोंडागाट्टू घाटामध्ये मंगळवारी राज्य महामंडळाची बस दरीत कोसळली.

Divya Marathi Sep 12, 2018, 06:56 IST
हैदराबाद- तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात कोंडागाट्टू घाटामध्ये मंगळवारी राज्य महामंडळाची बस दरीत कोसळली. यात ५२ प्रवासी मृत्युमुखी पडले असून २० जण जखमी झाले. मृतांमध्ये ६ बालके, २५ महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महामंडळाची बस कोंडागाट्टू डोंगरावर स्थित आंजनेय स्वामी (हनुमान) मंदिरापासून जगतियाल शहराकडे जात होती. प्राप्त माहितीनुसार, ५४ आसनक्षमता असलेल्या बसमध्ये ७२ प्रवासी होते. वळणावर बसचा ब्रेक निकामी झाल्याने ही भीषण घटना घडली. 

 

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाश्यांनी भरली होती बस...

जगतियाल जिल्ह्याचे विभागीय महसूल अधिकारी जी. नरेंद्र यांनी ही बस क्षमतेपेक्षा अधिक प्रवाश्यांनी भरलेली होती असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की "ही जगतिलाय जिल्ह्यातील एक लोकल बस होती. तसेच शनिवारमपेटातून जगतियाल जिल्ह्याकडे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरून येत होती. कोंडाघट्टूवर पोहोचली तेव्हा एक घाट लागला आणि त्याच ठिकाणी चालकाचा बसवरील ताबा सुटला. यानंतर बस थेट दरीत जाऊन कोसळली. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. यानंतर दुपारी 12.15 वाजता बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. 

 

ब्रेक फेल झाल्याची शक्यता... 

स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातासाठी ब्रेक फेल झाल्याचे कारण असू शकते असा अंदाज वर्तवला आहे. घाटाजवळ असताना एका वळणावर बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरीही यासंदर्भात सविस्तर तपास केला जाणार आहे.


Loading...

Recommended


Loading...