Loading...

मुदतीच्या ९ महिन्यांआधी तेलंगणा विधानसभा भंग; टीआरएसने १०५ उमेदवारांची यादीही जाहीर केली

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली.

Divya Marathi Sep 07, 2018, 06:50 IST

हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तेलंगणामध्ये लोकसभा निवडणकीसोबतच विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र, राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या ९ महिने आधीच  विधानसभा भंग करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. ही शिफारस राज्यपालांनी मंजूर करताच तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) तातडीने १०५ उमेदवारांची यादीही जाहीर करून टाकली. विधानसभेच्या एकूण ११९ जागा असून मावळत्या विधानसभेत सत्तारूढ टीआरएसचे ९०, काँग्रेसचे १३, तर भाजपचे ५ सदस्य होते. 


वर्चस्व घटण्याची भीती
तेलंगणात टीआरएसचे वर्चस्व आहे. या वर्षाखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होत असलेल्या निवडणुकीपैकी एका राज्यात जरी काँग्रेसला यश मिळाले तर लोकसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये काँग्रेसची शक्ती वाढू शकते, अशी राव यांना धास्ती आहे. 


Loading...

Recommended


Loading...