Loading...

स्वप्नीलच्या पावलावर त्याच्या चिमुकल्याचे पाऊल, नऊ महिन्यांच्या राघवचे जाहिरातीतून पदार्पण

अभिनेता स्वप्नील जोशीचा नऊ महिन्यांचा मुलगा राघवचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आहे

Divya Marathi Sep 07, 2018, 09:53 IST


मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशीचा नऊ महिन्यांचा मुलगा राघवचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आहे. चिमुकला राघव आता कमर्शिअल जाहिरातीत झळकला आहे. गोंडस राघव जॉन्सन अण्ड जॉन्सन्सच्या जाहिरातीत झळकतोय. या जाहिरातीत त्याच्यासोबत त्याचे आई-बाबा म्हणजेच स्वप्नील आणि त्याची पत्नी दोघंही उत्पादनाबद्दल माहिती देताना पाहायला मिळतायत.

 

या उत्पादनाबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, “मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन” च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टॉप टू टो वॉश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे 5.5 लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस्ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी याचीच निवड केली.”

 

स्वप्नील आणि लीना 16 डिसेंबर 2011 रोजी विवाहबंधनात अडकला. या दाम्पत्याला मायरा ही मुलगा आणि राघव हा मुलगा आहे. 23 मे 2016 रोजी मायराचा जन्म झाला आणि त्यानंतर राघवचा 7 डिसेंबर 2017 रोजी जन्म झाला. आता राघव 9 महिन्याच्या असून त्याने जाहिरातीत एन्ट्री घेतली आहे.  


Loading...

Recommended


Loading...