Loading...

​'रईस' चित्रपटातील 'लैला मै लैला...' गाण्यावर सनी लियोनीचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीचा बायोपिक वेब सीरीजचा दूसरा पार्ट लवकरच रिलीज होणार आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 15:41 IST
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीचा बायोपिक वेब सीरीजचा दूसरा पार्ट लवकरच रिलीज होणार आहे. 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी'चा पहिला सीजन लोकांना खुप आवडला आहे. या सीरीजच्या पहिल्या सीजनमध्ये सनीचे बालपण आणि तिच्या आयुष्याविषयी काही किस्से सांगण्यात आले. जे लोकांना माहिती नव्हते. आता वेबसीरीजचा दूसरा पार्ट 18 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याचे प्रमोशन करण्यासाठी सनी पुरेपुर प्रयत्न करतेय. सनीच्या या बायोपिकसंबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. यामध्ये सनी आपल्या चाहत्यांसोबत शाहरुख खान स्टारर 'रईस' चित्रपटातील 'लैला मै लैला...' गाण्यावर ठुमके लावतेय.


Loading...

Recommended


Loading...