Loading...

Sunny Leone: वयाच्या 10 व्या वर्षी पाहिली पॉर्न मूव्ही, विचारही केला नव्हता यात मी काम करेन

पॉर्न स्टार सनी लियोनने पहिल्यांदा पॉर्न मूव्ही पाहिली तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती.

Divya Marathi Aug 26, 2018, 16:43 IST

मुंबई - पॉर्न स्टार सनी लियोनने पहिल्यांदा पॉर्न मूव्ही पाहिली तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती. त्यावेळी अतिशय घाणेरडे आणि किळसवाणे वाटले होते. त्यावेळी कधी विचारही केला नव्हता की अशा अॅडल्ट चित्रपटांमध्ये एकेदिवशी मीच काम करेन. ही गोष्ट सनीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट व्यक्त केली आहे. सनी पुढे म्हणाली, "जेव्हा आपण लहान असतो तेव्हा कुणालाच माहिती नसते की मोठे होऊन काय होईल? 8-10 वर्षांचे असताना तर अशा गोष्टी पाहणे आणि तीच गोष्ट प्रौढ झाल्यानंतर पाहणे यात खूप फरक आहे." उल्लेखनीय बाब म्हणजे, लवकरच तिच्या बायोपिकचे दुसरे सीझन रिलीझ होत आहे. 

 

पॉर्न मूव्ही पाहिल्यानंतर रडली होती सनी
सनी लियोनने आपले बायोपिक 'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' मध्ये खुलासा केला की तिने पहिल्यांदा पॉर्न मूव्ही पाहिल्यानंतर ती गुरुनानक यांच्या फोटोसमोर बसून खूप रडली होती. कारण, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली असे तिला वाटत होते. आपल्या चुकीबद्दल ती गुरुनानक यांच्या फोटोसमोर रडताना हात जोडून माफी मागत होती, की "बाबाजी, मला माहिती नव्हते... माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे." 


19 वर्षांची असताना सनीने केला पहिला पॉर्न चित्रपट
सनीने पॉर्न इंडस्ट्रीत पहिले पाऊल ठेवले त्यावेळी ती 19 वर्षांची होती. तिने यात प्रवेश करण्याचा निर्णय स्वतः घेतला होता. तरीही पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर ते नाराज होते. एक मुलाखतीमध्ये तिने सांगितले, "मी पालकांना विश्वासात न घेता पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. माझ्यासाठी हे केवळ एक बिझनेस होते. पेंटहाउस (एडल्ट इंडस्ट्रीतील लोकप्रीय मॅगझीन) च्या 'पेट ऑफ द ईयर' आणि एक लाख अमेरिकन डॉलर जिंकले होते. तेव्हा पालकांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. तेव्हा सामान्य पालकांप्रमाणेच ते माझ्यावर नाराज झाले होते. तरीही मी ठाम निर्णय घेतला होता की मला काय करायचे होते त्यानंतरच पालकांचाही होकार मिळवला." 2003 पूर्वी ती सॉफ्टकोअर पॉर्नमध्ये होती. यानंतर तिने 3 वर्षांच्या करारासह हार्डकोर पॉर्नमध्ये पदार्पण केले. 41 अॅडल्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या सनीने स्वतः 25 चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. 2011 मध्ये 'बिग बॉस 5' मध्ये ती सहभागी झाली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली.


Loading...

Recommended


Loading...