रात्री जेवढी शांत झोप लागेल तेवढे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. सकाळी फ्रेश उठल्यामुळे दिवसभरातील आव्हानांना तुम्ही सहजपणे सामोरे जाऊ शकता. अमेरिकेचे फेमस लेखक अरिआना हफिंगटन यांनी बिझनेस इनसायडरला सांगितले की, झोप न लागणे आणि तणाव किंवा निगेटिव्ह हेल्थचा थेट संबंध आहे. जगातील बहुतांश यशस्वी आणि श्रीमंत लोक झोपण्यापूर्वी काही सवयींपासून दूर राहतात. यशस्वी लोकांच्या मतानुसार आयुष्यात झोपेचेही खास महत्त्व आहे. याच कारणामुळे हे लोक नेहमी शांत झोपेवर फोकस करतात आणि काही सवयींपासून नेहमी दूरच राहतात...
नंबर-1: दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करायला विसरणे
दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग केल्यास तुमची सकाळ आरामदायक होऊ शकते. बहुतांश यशस्वी लोक रात्रीच दुसऱ्या दिवसाची प्लॅनींग केल्याशिवाय झोपत नाहीत, याउलट अपयशी लोक झोपी जातात. प्लॅनिंग न करता झोपणे दुसऱ्या दिवसाची सुरुवात खराब करू शकते.