Loading...

Tula Pahte Re : ...म्हणून सुबोध भावे म्हणतोय, 'दुनिया गोल हैं'

या फोटोत सुबोधच्या हस्ते एका लहान मुलीला बक्षिस मिळाल्याचे आपण पाहू शकतो.

Divya Marathi Sep 07, 2018, 11:24 IST

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका गाजत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावेने ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यातील त्याने साकारलेली विक्रम सरंजामे ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर ईशा म्हणजे गायत्री दातारही प्रेक्षकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. वय विसरायला लावणाऱ्या या मालिकेचा एक वेगळाच योगायोग समोर आला आहे. 

 

सुबोध भावेने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत  सुबोधच्या हस्ते एका लहान मुलीला बक्षिस मिळाल्याचे आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गायत्री दातार आहे.

 

हा फोटो शेअर करुन सुबोधने लिहिले, "दुनिया गोल हैं".. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं. मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी "तुला पाहते रे"च्या सेटवर तिची गाठ पडली आणि तिनी मला या प्रसंगाची आठवण करून दिली. मी थक्क!! ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती "इशा" म्हणजेच "गायत्री दातार" स्वप्नांवरचा माझा विश्वास अजूनच वाढला. #तुलापहातेरे." 


Loading...

Recommended


Loading...