Loading...

तरुणी पाहत होती FB पोस्ट, अचानक दिसला स्वतःचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, समोर आले धक्कादायक सत्य

पोलिसांच्या मते आरोपी गर्लफ्रेंडच्या मदतीने हॉस्टेलमध्ये गेला आणि त्याठिकाणी स्पाय कॅमेरा लावला.

Divya Marathi Sep 05, 2018, 11:09 IST

बेंगळुरू - येथील एका इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. त्याने सोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडने हा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्याची मदत केली होती. पोलिसांच्या मते आरोपी गर्लफ्रेंडच्या मदतीने हॉस्टेलमध्ये गेला आणि त्याठिकाणी स्पाय कॅमेरा लावला. आरोपीने व्हिडिओ फेसबूकवरही अपलोड केला. आरोपीचे नाव सिद्धार्थ असून तो तमिळनाडूचा आहे. 


गर्लफ्रेंडला केले ब्लॅकमेल 
सिद्दार्थच्या गर्लफ्रेंडने पोलिसांना याबाबत संपूर्ण माहिती दिली. ती सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा तिने त्याला स्वतःचा एक न्यूड व्हिडिओ पाठवला होता. पण काही दिवसांनी सिद्धार्थ त्या व्हिडिओच्या मदतीने तिलाच ब्लॅकमेल करू लागला होता. त्याने व्हिडिओ कोणाला दाखवायचा नसेल तर हॉस्टेलमधील इतर तरुणींचे व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत करण्याची अट तिच्यासमोर ठेवली होती. 

   
असा झाला खुलासा 
पीडितेने एका फेक अकाऊंटवर तिचे स्वतःचे न्यूड फोटो पाहिले तेव्हा तिच्या हे सर्व लक्षात आले. पोलिसांनी सांगितले की, सर्च केल्यानंतर तिचा बाथरूममध्ये अंघोळ करतानाचा व्हिडिओदेखिल मिळाला. त्यानंतर पीडितेची रूममेटच आरोपीची गर्लफ्रेंड असल्याचे समजले. त्यानेच हे सर्व केले होते. 
 

सिद्धार्थनेच अपलोड केला व्हिडिओ 
तपासात समोर आले की, सिद्धार्थनेच फेसबूकवर व्हिडिओ अपलोड केला होता. पीडितेशिवाय आणखी तीन इंजीनिअरींग स्टुंडंट्सचेही व्हिडिओदेखिल त्याने अपलोड केले होते. त्या तिघीदेखिल त्याच्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणी होत्या. सिद्धार्थ न्यूड व्हिडिओ दाखवून तरुणींना ब्लॅकमेल करायचा आणि त्याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायचा असाही आरोप आहे. पोलिसांनी सर्व विद्यार्थिनींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत. 


Loading...

Recommended


Loading...