Loading...

नंदूरबारमध्‍ये एसटी बस व पिकअपची धडक, 12 प्रवासी जखमी

देवळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक पिकअपचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले.

Divya Marathi Sep 07, 2018, 10:16 IST

देवळा- देवळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक पिकअपचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 


दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी नंदुरबार आगाराच्या बसचा अपघात झाला. खडकतळे (ता. देवळा) येथील मालवाहतूक पिकअप पिंपळगाव बसवंत येथे टाेमॅटाे घेऊन जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामेश्वर फाट्याजवळ भरधाव असलेल्या मुंबई-नंदुरबार बसने (एम. एच. २० - बीएल ३१०८) पिकअपला (एम. एच. ४१ - जी ९६८४) जोरदार धडक दिल्याने बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. 


जखमींमध्ये बसचा चालक फारूख कुरेशी (नंदुरबार), लीलाबाई साहेबराव भदाणे, साहेबराव पुंडलिक भदाणे (उंभर्टी, साक्री), तुषार मनोहर वसावे (धानोरा), मारुती नाथू जाधव, मेघनाथ वसंत पवार (खडकतळे), श्याम जवशील (बंगळुरू), अनिता रेबेका (बंगळुरू), अशोक चिंतामण शिंदे (जालना), सुनंदा अशोक बच्छाव (माळवाडी), रॉबिन चांदणे (देवळाली कॅम्प), पुष्पलता शिवाजी देवरे (साक्री) यांचा समावेश आहे. बसच्या चालकाला अधिक उपचारासाठी मालेगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

 


Loading...

Recommended


Loading...