Loading...

PHOTOS : श्रीदेवी यांनी असा साजरा केला होता शेवटचा बर्थडे, पार्टीत रेखा-ऐश्वर्यासह पोहोचले होते अनेक सेलेब्स

श्रीदेवी यांचा आज (सोमवार) वाढदिवस आहे. त्या आज आपल्यात असल्या तर त्यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती.

Divya Marathi Aug 14, 2018, 15:01 IST

मुंबईः श्रीदेवी यांचा आज (सोमवार) वाढदिवस आहे. त्या आज आपल्यात असल्या तर त्यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे  13 ऑगस्ट 2017 रोजी श्रीदेवी यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. दुर्दैवाने तो त्यांचा शेवटचा वाढदिवस ठरला होता.  श्रीदेवी यांच्या ग्रॅण्ड बर्थ डे पार्टीत रेखा, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन, मनीष मल्होत्रा, करण जोहर आणि विद्या बालनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. श्रीदेवी यांचे बेस्ट फ्रेंड मनीष मल्होत्रा यांनी ही पार्टी होस्ट केली होती. यापार्टीत कपूर फॅमिलीतून अनिल कपूर, सुनीता कपूर, सोनम, संजय कपूर, महीप कपूर, शनाया पोहोचले नव्हते.

 

24 फेब्रुवारी रोजी झाले निधन...

याचवर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील हॉटेल जुमेराह एमिरेट्स येथे श्रीदेवी यांचे निधन झाले होते. बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचे निधन झाले होते.

 

'जुली'द्वारे केले होते डेब्यू... 

13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे त्यांचा जन्म झाला होता. श्रीदेवी यांनी 1975 मध्ये 'जुली' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या रुपात झळकल्या होत्या. 1983 साली आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटाने त्या एका रात्रीतून स्टार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. श्रीदेवी अखेरच्या 'मॉम' या चित्रपटात झळकल्या होत्या. हा चित्रपट 7 जुलै 2017 रोजी रिलीज झाला होता.

 

या चित्रपटांमध्ये झळकल्या श्रीदेवी... 
श्रीदेवी यांनी 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987), 'गुरु' (1989), 'चालबाज' (1989), 'चांदनी' (1989), 'जुदाई' (1997) सह 300 चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो या चित्रपटात श्रीदेवींचा कॅमिओ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्रीदेवी यांच्या शेवटच्या वाढदिवसाच्या पार्टीची छायाचित्रे...

 

 


Loading...

Recommended


Loading...