Loading...

बाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...

आज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे.

Divya Marathi Sep 13, 2018, 00:00 IST

आज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पनीर मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा पनीर मोदक...

 

पनीर मोदकासाठी साहित्य-
- दीड वाटी मावा
- पनीर आर्धी वाटी
- २ वाट्या पिठीसाखर
- वेलायची पावडर
- थोडे केसर
- पाऊण वाटी किसलेले खोबरे...

 

कृती
- मावा मंद आचेवर कोरडा होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.
- पनीरला हाताने बारीक करा आणि केसर टाकून 2-3 मिनीट थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- आता पनीर थंड झाल्यास त्याल 2 चमचे साखर टाका. आणि छोटे-छोटे गोळे बनवा.
- थंड झालेल्या माव्यामध्ये वेलायची आणि साखर टाकून एकत्र करा. पनीर आणि माव्याचे सारखेच गोळे बनवा. माव्याचा एक गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात पनीरचे मिश्रण टाकून बंद करा.
- सर्व बनवलेल्या गोळ्यांना अशाप्रकारे मोदकांचा आकार द्या.
 प्लेटमध्ये सजवून बाप्पाला नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पालाही आवडेल तुमची ही नवीन पाककृती...
 
 


Loading...

Recommended


Loading...