Loading...

साठ वर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून अत्याचार, निफाड येथील घटना

साठ वर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून अत्याचार केल्याची घटना निफाड येथे घडली. पाेलिसांनी रात्रीच परिसरातील विविध दुक

Divya Marathi Sep 08, 2018, 10:21 IST

निफाड- साठ वर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून अत्याचार केल्याची घटना निफाड येथे घडली. पाेलिसांनी रात्रीच परिसरातील विविध दुकांनांमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. या तपासणीच्या अाधारे संशयित राजेशराय दिनालाल यादव (२५, मूळ रा. बेगुसराय, बिहार, हल्ली रा. निफाड) यास २४ तासाच्या अात अटक केली. 


निफाडमधील उगावराेडवर गुरुवारी मध्यरात्री पद्मावती कलेक्शन दुकानाच्या बाहेर एकानेे या महिलेच्या डोक्यावर, हातावर दांड्याने मारहाण करून अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना कळल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले, पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहायक निरीक्षक जयवंत सातव, अडसूळ, उपनिरीक्षक अमोल पवार यांनी जखमी वृद्धेस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिलावट, हवालदार बांबळे, नरेंद्र पाटील, मनोज आहेर, जयकुमार महाजन, विलास बिडगर, विश्वनाथ निकम, भगवान निकम तपास करीत अाहे. 


Loading...

Recommended


Loading...