मुंबई - गतकाळातील अभिनेत्री सिंपल कपाडियाची आज 60 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला होता. अनेक चित्रपटांत काम करुनही सिंपल यांना यश मिळाले नाही आणि मग त्यांनी अभिनय सोडून डिझायनरचे काम सुरु केले. अनेक चित्रपटांसाठी सिंपल यांनी कॉश्च्युम डिझाईनचे काम केले. 'रुदाली' चित्रपटासाठी सिंपल यांना बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइनरचा पुरस्कारही भेटला होता. 2006 साली त्यांना कॅन्सर झाला आणि त्यामुळेच 2009
साली त्यांनी जगाला अलविदा केले.
'अनुरोध' चित्रपटातून केला होता डेब्यू..
सिंपल यांनी 1977 साली 'अनुरोध' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांचे हिरो राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना यांचा विवाह डिंपल यांच्यासोबत झाला होता. सिंपल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जीजूंसोबतच काम करत असल्याने त्यांना रोमँटीक सीन शूट करतेवेळी फार विचित्र वाटत असे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.
पुढच्या स्लाईडवर वाचा, त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी..