Loading...

Movie Review:'ओ स्त्री कल आना' असे मजेदार डायलॉग्स, फुल टू कॉमेडी आहे 'स्त्री'

चित्रपटाची कथा मध्य प्रदेशाच्या चंदेरी येथील आहे. येथे विक्की (राजकुमार राव) एक लोकल टेलर आहे.

Divya Marathi Aug 31, 2018, 18:23 IST
Genre: हॉरर कॉमेडी ड्रामा Director: अमर कौशिक Plot: डायरेक्टर अमर कौशिक ने 'स्त्री' चित्रपटातून डायरेक्शनमध्ये डेब्यू केला आहे. 
क्रिटिक रेटिंग 3.5/5
स्टार कास्ट राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ति खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बनर्जी
डायरेक्टर अमर कौशिक
प्रोड्यूसर दिनेश विजन, डीके
जोनर हॉरर कॉमेडी ड्रामा
ड्यूरेशन 127 मिनिटे

 

'स्त्री'ची कथा : चित्रपटाची कथा मध्य प्रदेशाच्या चंदेरी येथील आहे. येथे विक्की (राजकुमार

राव) एक लोकल टेलर आहे. आपल्या कामात एक्सपर्ट असलेला विक्की महिलांचे माप न घेताच त्यांना फक्त पाहूनच त्यांच्या साइजचे कपडे शिवतो. यामुळेच त्याला चेंदेरीचा मनीष मल्होत्रा असेल म्हटले जाते. विक्कीसोबतच चंदेरीमध्ये स्त्री नावाची एक भुतनी प्रसिध्द आहे. गावातील लोक स्त्रीपासून वाचण्याचा मार्ग शोधत असतात आणि आपल्या घराबाहेर वटवाघूळ आणि गोमूत्राची शाई बनवून- 'ओ स्त्री कल आना' असे लिहितात. येथे प्रत्येक वर्षी गावात चार दिवसांचे पूजा फेस्टिव्हल असते. विक्की हा आपला मित्र बिट्टू(अपारशक्ति खुराना) आणि जना (अभिषेक बनर्जी)सोबत राहतो. यावेळी विक्कीची भेट श्रध्दा कपूरसोबत होते. ती फक्त पूजेच्या रात्रीच गावात राहते. या चार रात्रींमध्ये गावात स्त्रीचा कहर वाढतो अशावेळी त्याचे मित्र विक्कीला सांगतात की, तुझी गर्लफ्रेंड भूत आहे. तेव्हाच चंदेरी येथे राहणारा रुद्र (पंकज त्रिपाठी) या मित्रांना चंदेरी पुराणाच्या माध्यमातून स्त्री आणि त्यामागची सत्यता सांगतो. आता श्रध्दा कपूरच स्त्री आहे का? स्त्रीचे रहस्य काय आहे? यासोबतच विक्की आपल्या मित्रांना आणि गावातील लोकांना स्त्रीच्या कहरापासून कसा वाचवतो. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळतील. 

 

 


Loading...

Recommended


Loading...