Loading...

माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शौर्य मिशन; आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची निवड

माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शौर्य २ मिशन प्रशिक्षणासाठी आदिवासी आश्रम शाळा किन्ही नाईक तालुका चिखली जिल्हा बुलडाणा येथ

Divya Marathi Sep 08, 2018, 11:47 IST

बुलडाणा- माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शौर्य २ मिशन प्रशिक्षणासाठी आदिवासी आश्रम शाळा किन्ही नाईक तालुका चिखली जिल्हा बुलडाणा येथील अकरावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ते आज, ७ सप्टेंबर रोजी दार्जिलिंगकडे रवाना झाले आहेत. 


राज्यात झालेल्या इतर विभागातील प्रशिक्षित विद्यार्थी शासनामार्फत माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी मिशन शौर्य २ साठी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासी विद्यालयाचे विद्यार्थी रतन ओंकार इंगळे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा साहित्य देऊन संस्थेतर्फे अध्यक्ष अॅड. दत्ता भुतेकर, सचिव रेखा भुतेकर उपाध्यक्ष रसिका भुतेकर सत्कार करण्यात आला. 


Loading...

Recommended


Loading...