Loading...

सत्ताधाऱ्यांमुळेच धार्मिक, जातीय सामंजस्याचा अभाव; शरद पवार यांची भाजपवर टीका

शहरांचे नागरीकरण वाढत अाहे. त्यात काय सुविधा देता येतील, हे पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमागे सत्ताधाऱ्यांनी उभे

Divya Marathi Sep 03, 2018, 07:08 IST

धुळे- शहरांचे नागरीकरण वाढत अाहे. त्यात काय सुविधा देता येतील, हे पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमागे सत्ताधाऱ्यांनी उभे राहायला हवे. मात्र तशी स्थिती दिसत नाही. देशपातळीवर मुद्द्यांची चर्चा हाेते. पण त्यातही टीकाच जास्त हाेते, असा अाराेप करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या सरकारवर ताेफ डागली. 


‘सत्ताधाऱ्यांच्या संकुचित विचारसरणीमुळे धार्मिक, भाषिक व जातीय सामंजस्याचा अभाव अाहे. त्यामुळे सर्व घटकांना न्याय मिळत नाही’, असेही पवार म्हणाले. धुळे मनपाच्या नूतन इमारत लाेकार्पण कार्यक्रमात ते बाेलत हाेते.


पवार म्हणाले की,  सत्तेत असणाऱ्यांचा दृष्टिकाेन विकासाला प्राेत्साहन देणारा असावा. मात्र तसे हाेताना दिसत नाही. त्यामुळे मर्यादित विचार पुढे येताे. सध्या असा विचार देशभरात वाढत अाहे,  असेही पवार म्हणाले.


Loading...

Recommended


Loading...