Loading...

'शनाया'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप, बघा 'माझ्या नव-याची बायको'च्या सेटवरील तिची ऑफस्क्रिन धमाल-मस्ती

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रसिका सुनील अर्थात सर्वांची लाडकी शनाया हिने या मालिकेला आता रामराम ठोकला आहे.

Divya Marathi Aug 31, 2018, 12:31 IST

एन्टरटेनमेंट डेस्क - 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रसिका सुनील अर्थात सर्वांची लाडकी शनाया हिने या मालिकेला आता रामराम ठोकला आहे. उच्चशिक्षणासाठी रसिका सुनील लॉस एंजिलिसला गेली आहे. शेवटचे दोनच भाग आता शनायाच्या रुपात रसिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रसिकाने खलनायिका जरी साकारली असली तरी ती प्रेक्षकांची तितकीच लाडकी आहे, याचे कारण आहे की शनाया लोकांना खलनायिका नव्हे तर एक वाट चुकलेली मुलगी वाटते. कोणत्याही कार्यक्रमाला या मालिकेची टीम गेल्यावर तिथे रसिकावर टीकेऐवजी तिच्यावर कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला आहे. 

 

असा सुरु झाला रसिकाचा अभिनयाचा प्रवास...
रसिका सुनील जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती तेव्हा तिने कॉलेज युथ फेस्टीव्हलदरम्यान एक अॅक्टींग वर्कशॉप केले होते. यानंतर रसिकाने राज्यनाट्य पुरस्कारात 'लव्ह आज कल' या एकांकीकेत लीड रोल केला होता. विशेष म्हणजे यासाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.

 

राज्यनाट्य केल्यानंतर लागली अभिनयाची गोडी..
रसिकाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, राज्यनाट्यानंतर तिच्यामध्ये अभिनयाबद्दलची आवड निर्माण झाली आणि तिने अभिनयक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका, बसस्टॉप हा चित्रपट आणि पोश्टरबॉईज या चित्रपटात लावणीही सादर केली आहे.

 

लावणीसाठी केली होती 9-10 तास रिहर्सल..
'पोश्टर बॉईज' या चित्रपटात रसिकाने प्रथमच लावणी सादर केली होती. या लावणीचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर करणार हे एकून ती तणावात आली आणि यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार हे तिला कळून चुकले होते. पहिल्या दिवशी फुलवाने फटकारल्यानंतर रसिकाने रात्री घरी जाऊन 9-10 तास रिहर्सल केली होता आणि अखेर तिला तिच्या मेहनतीची पोचपावती फुलवानेच कौतुक करुन दिली होती.


गायिकासुद्धा आहे रसिका...
रसिका अभिनेत्रीसोबतच एक उत्तम गायिकासुद्धा आहे. नुकताच तिचा ‘यू अँड मी’ हा अल्बम रिलीज झाला आहे. रसिकासोबत अभिनेत्री आदिती द्रविड हिने या अल्बममध्ये आहे. व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, माझ्या नव-याची बायको या मालिकेच्या सेटवरील शनाया म्हणजेच रसिका सुनील हिची ऑफस्क्रिन धमालमस्ती... 


Loading...

Recommended


Loading...