Loading...

शाहिद कपूरच्या घरी आला ज्यूनिअर शाहिद, बाळा पाहण्यासाठी पोहोचले आजी आणि काका

शाहिद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने दूस-या बाळाला मुंबईच्या हिन्दुजा हॉस्पिटलमध्ये जन्म दिला.

Divya Marathi Sep 06, 2018, 13:47 IST

मुंबई: शाहिद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने दूस-या बाळाला मुंबईच्या हिन्दुजा हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. डिलिवरी दरम्यान मीराची आई बेला राजपूत तिच्यासोबत होत्या. सध्या आई बाळ दोघंही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांचा कोणताही फोटो अजून समोर आलेला नाही. पत्नीच्या प्रेग्नेंसीच्या काळात शाहिद आपल्या प्रोफेशनल वर्कमध्ये व्यस्त होता. पहिले तो आपला चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू'च्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये गेला होता आणि त्यानंतर तो याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला. शाहिद यामुळे दुःखी झाला होता. तो म्हणाला की, "जेव्हा मीशा होणार होती, तेव्हा मी काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. यावेळीही मला असे करायचे होते, परंतू करु शकलो नाही. कामात व्यस्त असल्यामुळे केवळ एक आठवडाच ब्रेक घेऊ शकलो. मला मीरासाठी एक महिना ब्रेक घ्यायचा होता." शाहिदची आई नीलिमा अजीम, भाऊ ईशान खट्टरही बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. 


मुलाच्या नावासाठी मिळत आहेत सजेशन्स 
- शाहिद-मीराच्या मुलाच्या नावासाठी सोशल मीडियावर फॅन्स या कपलला मजेदार सजेशन देत आहेत. यामध्ये राहिद कपूर आणि शमी कपूर हे दोन महत्त्वाचे ऑप्शन्स समोर येत आहेत.
- केआरकेने ट्वीट करुन म्हटले की, "सर प्लीज बेबी बॉयचे नाव शमी कपूर असावे, जसे मीशा कपूर आहे. शमी हे तुमच्यासाठी खुप चांगले नाव आहे."
- तर एका यूजरने लिहिले, "पहिले बेबी गर्लचे नाव  Mi+Sha=Misha होते तर बेबी बॉयचे नाव Ra+Hid=Rahid असे असेल."


2016 मध्ये मीराने दिला होता पहिल्या बाळाला जन्म 
- बेबी कपूरच्या जन्मानंतर चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत. आलिया भट, प्रिती झिंटा, करणवीर बोहरासोबतच अनेक स्टार्सने शाहिद-मीराला शुभेच्छा दिल्या आहेत.
- शाहिद-मीराच्या लग्नाच्या एक वर्षानंतरच मुलगी मीशा (26 ऑगस्ट 2016)चा जन्म झाला. ती या 26 ऑगस्टला 2 वर्षांची झाली. 

 

 

 


Loading...

Recommended


Loading...