Loading...

शाहिदने सेलिब्रेट केला मुलीचा दूसरा बर्थडे, पार्टीत पोहोचल्या मीशाच्या 2 आजी

शाहिद कपूरने रविवारी मुलगी मीशाचा दूसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहिदने आपल्या घरीच छोटीशी पार्टी ठेवली होती.

Divya Marathi Aug 28, 2018, 12:05 IST

एन्टेटन्मेंट डेस्क: शाहिद कपूरने रविवारी मुलगी मीशाचा दूसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहिदने आपल्या घरीच छोटीशी पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये मीशाचे अजोबा पंकज कपूर आणि दोन्ही आजी नीलिमा अजीम आणि सुप्रिया पाठक पोहोचल्या. यावेळी मीशाची आई मीराने मीशाचा एक क्यूट फोटो शेअर केला. मीराने फोटोला 'हॅप्पी बर्थडे टू दि लाइट ऑफ ऑव्हर लाइव्स' असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये मीशा ब्लू अँड व्हाइट ड्रेसमध्ये टेरेसवर बसलेली दिसतेय. पार्टीच्या फोटोजमध्ये मीरा स्वतः खुप गोर्जियस दिसतेय. तिने यावेळी एक ब्लॅक ड्रेस घातला होता. यामध्ये काळे स्टार्सचे प्रिंट होते. तर शाहिद कॅज्यूअल टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला. पार्टीचा एक इनसाइड व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये मीशा कँडल विझवण्याचा प्रयत्न करतेय. तिला कँडल विझवता येत नाही, तेव्हा काका ईशान खट्टर तिची मदत करतो. एका फोटोमध्ये मीशा ही काका ईशान यांच्या खांद्यावर बसलेली दिसतेय.


पार्टीमध्ये दिसले हे सेलेब्स 
पार्टीमध्ये रवीना टंडन आपली मुलगी राशासोबत आणि डायरेक्टर अभिषेक कपूरची पत्नी प्रज्ञा यादव आपल्या मुलासोबत पोहोचली. शाहिदच्या आई नीलिमा अजीम ईशान खट्टरसोबत आल्या, तर सुप्रिया पाठक पंकज कपूरसोबत पोहोचल्या. मीराच्या आईसुध्दा पार्टीमध्ये पोहोचल्या. यावेळी ईशाननेह मीशासोबतचा क्यूट फोटो शेअर केला. त्याने 'गुचकी बेबी' असे कॅप्शन दिले. 

 

दूस-या बाळाची आई होणार आहे मीरा 
मीरा लवकरच दूस-या मुलाची आई होणार आहे. मीरा आणि शाहिदने जुलै, 2015 मध्ये लग्न केले होते आणि 2016 मध्ये मीशाचा जन्म झाला. शाहिदचा 'बत्ती गुल, मीटर चालू' चित्रपट लवकरच येणार आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...