Loading...

आपल्याला येणारे Call किंवा SMS दुसऱ्यांना तर जात नाहीत ना? अवघ्या काही सेकंदात सांगतील हे 3 Codes

अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याला काही सिम्पल स्टेप्स सांगणार आहोत.

Divya Marathi Sep 08, 2018, 12:05 IST

गॅजेट डेस्क - आपल्या मोबाईल नंबरवर येणारे कॉल आणि एसएमएस डायव्हर्ट केलेले आहेत का? ते दुसऱ्यांना तर जात नाहीत ना? अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याला काही सिम्पल स्टेप्स सांगणार आहोत. ज्यातून आपल्याला ही संपूर्ण माहिती अवघ्या काही सेकंदांत मिळू शकले. यासाठी काही कोड नंबर आहेत. ते डायल करून आपण कॉल किंवा मेसेज डायव्हर्टची कंडिशन जाणून घेऊ शकता.

 

*#21#
या कोडच्या माध्यमातून आपल्याला कॉल किंवा एसएमएस डायव्हर्ट केले आहेत का याची माहिती मिळेल.

*#62#
या कोडच्या माध्यमातून आपल्याला व्हॉइस कॉल फॉरवर्ड केले आहेत का याचा तपशील समोर येईल. 

##002#
कॉल डायव्हर्ट किंवा कॉल फॉरवर्ड अशा सर्वच सुविधा बंद करण्यासाठी हा कोड डायल करावा.


Loading...

Recommended


Loading...