Loading...

50% किमतीत विकल्या जात आहेत यूज्ड SUV, स्कॉर्पियोपासून फॉर्च्युनरपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध

अनेकदा बजेटमुळे एसयूव्ही घेणे शक्य होत नाही. पण सेकंड हँड मार्केटमध्ये ही अडचण बर्याच अंशी दूर होते.

Divya Marathi Sep 11, 2018, 12:14 IST

नवी दिल्ली - भारतीय बाजारपेठेमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्सची मागणी सर्वात वेगाने वाढत आहे. हॅचबॅकऐवजी ग्राहक सेडान किंवा एसयूव्ही कार वापरणे पसंत करतात. पण अनेकदा बजेटमुळे एसयूव्ही घेणे शक्य होत नाही. पण सेकंड हँड मार्केटमध्ये ही अडचण बर्याच अंशी दूर होते. याठिकाणी या कार 25 ते 50 टक्के कमी दरावर खरेदी करता येतात. 

 

सर्टि‍फाइड यूज्ड कार खरेदीचा पर्याय 
सेकंड हँड कार घेण्यासाठी ड्रूम, कारदेखो यांच्याबरोबरच टोयोटाच्या टोयोटा ट्रस्‍ट, महिंद्राच्या फर्स्‍ट चॉइस आणि मारुती सुजुकी इंडि‍याच्या ट्रूव्हॅल्‍यू याठिकाणीही सर्टि‍फाइड कार खरेदी करता येतात. येथे कारची संपूर्ण पाहणी केल्यानंतरच ती ग्राहकाला विकली जाते. तसेच त्यासाठी फायनान्सही केले जाते. या कंपन्यांमार्फत खरेदी करता येतील अशा काही कार आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगत आहोत. साधारणपणे त्या 4 ते 5 वर्षे जुन्या असतात. 
 

महिंद्रा स्‍कॉर्पि‍यो  
महिंद्राची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध एसयूव्ही स्‍कॉर्पि‍यो या मार्केटमध्ये स्वस्तात खरेदी करता येते. या कारमध्ये 140 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तसेच इंजीन 6 स्पीड गीअरबॉक्ससह येते. जवळपास 4.50 लाखांपर्यंत ती मिळते. 

 
पुढे वाचा- फॉर्च्युनर, सफारी आणि बोलेरोच्या किमतीबाबत..


Loading...

Recommended


Loading...